मधुमेही रुग्णांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
Monday, June 22nd, 2009 AT 5:06 PM
मुंबई - लठ्ठपणा आणि रक्तदाब कमी असणाऱ्या मधुमेही रुग्णांना (टाइप टू) उपयुक्त असणाऱ्या 'जीएलपी १' किंवा 'बाएटा' या औषधाला अमेरिकन डायबेटिस असोसिएशन आणि युरोपियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ डायबेटिस या संस्थांनी संयुक्तरीत्या मान्यता दिली आहे. मधुमेहावर अतिशय गुणकारी असणारे हे औषध जास्तीतजास्त भारतीय रुग्णांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्नही केले जात आहेत.
भारतात ४० दशलक्ष एवढे मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यापैकी ९५ टक्के रुग्णांना "टाइप टू' प्रकारचा मधुमेह आहे. लठ्ठपणामुळे पोटात अतिरिक्त ऊर्जा साठवली जाते. त्यामुळे चयापचय क्रिया तसेच इन्शुलिनच्या वापरावर त्यामुळे बंधने येतात. अशा वेळी बाएटासारखी औषधे परिणामकारक ठरतात. या औषधामुळे सर्वसाधारणपणे ३० आठवड्यांत पाच पौंडांपर्यंत वजन कमी होऊन रक्तातील साखरेवर नियंत्रण राखले जाते, असे सिद्ध झाले आहे.
मधुमेहावर तोंडावाटे तसेच इन्जेक्शनद्वारे घेण्याची बरीच औषधे आहेत. या औषधांची मात्रा घेतल्यानंतरही "टाइप टू' रुग्णांच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवणे शक्य होतेच असे नाही. बाएटा इन्जेक्शनने मात्र शंभर टक्के परिणाम साधता येतो. ही औषधे इतर औषधांसोबत किंवा काही रुग्णांमध्ये इन्शुलीनसोबतही दिली जातात. भारतीय रुग्णांमध्येही आता या औषधांचा वापर वाढत आहे, असे रहेजा रुग्णालयातील मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप तळवलकर यांनी सांगितले.
आतड्यांमध्ये नैसर्गिकरीत्या निर्माण होणाऱ्या हार्मोन्सप्रमाणे या औषधांचे कार्य चालते व शरीराला स्वतःचे इन्शुलिन तयार करण्यास मदत होते. हायपोग्लायकेमिया होण्याचा धोका यामुळे खूपच कमी असल्याची माहिती इंडिया डायबेटिस रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. ए. रामचंद्रन यांनी दिली.

No comments:
Post a Comment