भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे अनेक पुरावे आपल्याला सापडतात. "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।'' असा सार्थ गौरव पुराणामध्ये सापडतो. शहराची प्रमुख ही स्त्री असावी, कारण स्त्री जशी घराची धुरा समर्थपणे सांभाळते त्याचप्रमाणे शहराची काळजी ती घेऊ शकेल, अशी त्यामागे संकल्पना होती. अर्थात, हा वेदकालीन संदर्भ आहे.
घर सांभाळताना स्त्री ज्या निगुतीने हे कार्य करते, तसेच कार्य शहराची/नगराची काळजी घेताना ती करील, अशी भावना त्यामागे होती. वेदांमध्ये गार्गी, अपाला इत्यादी विदुषींची सूक्ते आहेत, म्हणजेच शैक्षणिकदृष्ट्याही स्त्री त्या काळी बरीच प्रगत होती.
मात्र हा ताळमेळ पुढे कोठेतरी चुकत गेला. पुरुषप्रधानता वाढीला लागली, अर्थात त्यालाही एक कारण होते. निसर्गतः पुरुषांमध्ये जास्त शक्ती असते. त्यामुळे "बळी तो कान पिळी'' या उक्तीनुसार हे सर्व घडत गेले असावे, असे वाटते. स्त्रियांवरील अत्याचार वाढत गेले. अनिष्ट प्रथांमध्ये त्यांना गुरफटून त्यांचा आत्मविश्वास कमी केला गेला. त्या स्वत्व हरवून गेल्याने दुर्बल बनल्या, अबला बनल्या; पण आज ही परिस्थिती बदलते आहे.
शिक्षणाने स्त्रियांना एक सामाजिक दर्जा मिळवून दिला. आज कित्येक स्त्रिया या नोकरी किंवा उद्योग समर्थपणे सांभाळत आहेत. मात्र नोकरी करणे, घर सांभाळणे, ही तारेवरची कसरत करताना स्त्री ही अनेक रोगांना सामोरी जाताना दिसतेय. मानसिक तणाव, पीसीओडी, उच्चरक्तदाब आणि मधुमेह हे अगदी सातत्याने आढळणारे विकार आपल्याला दिसतात. आज आपण मधुमेह आणि त्यामुळे होणारी मानसिक स्थित्यंतरे याबाबत पाहणार आहेत.
इन्शुलिन या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढणे, यालाच मधुमेह म्हणतात. बैठे काम, धावपळ, मानसिक उलघाल, व्यायामाचा अभाव आणि खाण्याच्या अयोग्य पद्धती... यामुळे मधुमेहाचे प्रमाण आज खूपच वाढले आहे. पूर्वी म्हणजेच आयुर्वेदकाळात स्त्रियांची मासिकपाळी चालू असेपर्यंत तरी मधुमेह होत नाही, असे एक मत होते. मात्र बाराव्या शतकात आचार्य डल्हण (एक आयुर्वेदतज्ज्ञ आणि सुश्रुतसंहितेचा टीकाकार) यांनी मात्र हे मत खोडून काढले. कारण देताना त्यांनी प्रत्यक्ष प्रमाणाने हे सिद्ध करता येत नसल्याचे सांगितले. याचा अर्थ त्या काळीसुद्धा स्त्रियांना मधुमेह होत होताच; पण त्याचे प्रमाण आजच्या एवढे गंभीर नसावे.
मधुमेहामुळे पूर्ण दिनचर्या, आहार-विहार बदलणे भाग पडते. अशा वेळी आहार-विहार व दिनचर्या याबद्दल परिपूर्ण माहिती डॉक्टरांकडून किंवा इंटरनेटसारख्या माध्यमातून मिळवून आपल्यात सुयोग्य बदल घडवायला हवेत. नवीन मधुमेहींना एक चिंता सुरवातीचे काही महिने सतावत असते. एकदा का अंगवळणी ती गोष्ट पडली, की मग मात्र त्या आजाराचे फारसे काही वाटत नाही. सुरवातीला झोप उडते. अशा वेळी मेडिटेशन, योग-व्यायाम करावेत.
साधारणपणे 35 वर्षे ते 40 वर्षांनंतर होणारा मधुमेह हा "टाईप-टू'' या प्रकारचा असतो. त्यामुळे चुकीचा आहार-विहार, शरीराचे योग्य वजन न ठेवणे, व्यायाम न करणे इत्यादी स्वतःचेच दोष त्याला कारणीभूत असतात. या वेळी स्त्रियांनी आरोग्यासाठी उत्तम काय, व्यायाम कसा व कोणता करावा, याविषयी तज्ज्ञ मंडळींकडून जाणून घ्यावे. वजन सुयोग्य ठेवण्याचा प्रयत्न करावा.

मधुमेहाला कधीच अनुल्लेखाने मारू नका. हा एक दीर्घकालीन घातक परिणामांचा विकार आहे. त्वरित असे काहीच नुकसान यापासून होत नाही. मात्र कालांतराने खूप त्रासदायक ठरणारा हा विकार आहे. सुयोग्य आहार-विहार आणि नियमित तपासण्या केल्या व औषधोपचार घेतले तर मधुमेहामुळे जीवनातील गोडी कमी होणार नाही.
मानसिकदृष्ट्या खचल्याची तीव्र भावना बऱ्याच स्त्रियांमध्ये खूप काळ टिकून राहते. यालाच "डिप्रेशन' असे म्हणतात. या आजारात झोप कमी होते, चिडचिड होते, निर्णयक्षमता कमी होते, खाण्यात आणि विचारात अनेक बदल होतात, वृत्तीत बदल होतात, स्वभाव रुक्ष आणि कोरडा बनतो.

जीवन निरर्थक वाटू लागते. काही वेळा ही अवस्था काही दिवसांची असते, तर काही वेळा कित्येक महिन्यांपर्यंत चालणारीसुद्धा असू शकते. मधुमेही व्यक्ती मानसिक रोगांना जास्त बळी पडतात, असे आढळून आले आहे. अशा वेळी मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. काही काळापुरते तरी काउन्सिलिंग व औषधोपचाराने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारण डिप्रेशनमुळे रक्तातील साखरेच्या पातळीत बरेच बदल होतात. अर्थात ते शरीराला अपायकारकच ठरतात.
मधुमेहामुळे स्त्रियांच्या योनिमार्गात कोरडेपणा येतो. दीर्घकालीन मधुमेह असल्यास योनिदाह होतो. श्वेतस्रावाची तक्रार तर कित्येक स्त्रिया करताना आढळतात. योनिमार्गामध्ये खाज उठणे किंवा फंगल इन्फेक्शन या अगदी नियमित आढळणाऱ्या घटना बनतात. त्याकरिता स्त्रियांनी मधुमेहाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. मूत्रमार्गाचे संसर्ग योग्य औषध घेऊन त्वरित बरे करून घ्यावेत. चरबीयुक्त पदार्थ कमी करावेत. जेवणात मीठ कमी वापरावे, कारण मधुमेहाच्या सोबतीने उच्चरक्तदाब (ब्लडप्रेशर) व हृदयविकार हे येणारच!
थोडक्यात, मधुमेह होऊ नये म्हणून सतर्क असावेच; पण झालाच तर दुर्लक्ष न करता तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार करावेत. काही स्त्रिया आयुर्वेदिक औषध घेणे पसंत करतात. अशांसाठी "यसाका'सारखी चांगली आयुर्वेदिक औषधे उपलब्ध आहेत. पूर्णतः वनस्पतींपासून बनवलेले "यसाका' हे द्रवरूपात बाजारात सहज उपलब्ध आहे.
"यसाका''मुळे पचनशक्ती सुधारते. इन्शुलिनचे कार्य कसदारपणे होते. रक्तशुद्धीकरण होते व मलबद्धता दूर होते. पर्यायाने रक्तातील साखरेवर नियंत्रण येते. थोडक्यात, आजच्या जागतिक महिलादिनी रक्तातील अति गोडवा स्त्रियांचे जीवन कडवट बनवू नये, अशी धन्वंतरीला प्रार्थना करू या!
- डॉ. धनंजय प्रभुदेसाई, सिमंधर हर्बल, प्रा. लि.

No comments:
Post a Comment